मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ( Local ) रात्रकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) ते कल्याण आणि पनवेल यादरम्यान धिम्या मार्गावर बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणार्या अधिकारी, कर्मचार्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे.
असे असेल वेळापत्रक
दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता सुटणार्या गाड्या