मुंबई,दि.१५ : प्रतिनिधी पावसाळ्यात मुंबईत उपनगरीय सेवा विनाअडथळा चालवण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याअंतर्गत पावसाळ्यात पाण्यात ट्रॅक पाण्यात बुडालेल्या परिस्थितीत असताना पॉइंट मशीन फेल्युअर्स रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान केल्याबद्दल मध्य रेल्वेने सर्वोत्कृष्ट नवोपक्रमाचे पहिले पारितोषिक जिंकले. विशेषत: पावसाळ्यात स्थितीत पॉइंट मशीनचे बिघाड टाळण्यासाठी उपाय शोधण्यासाठी मध्य रेल्वेच्या टीमने केलेल्या प्रयत्नांसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे.
पॉइंट मशीन कव्हरमधील बदल मध्य रेल्वेच्या टीमने स्वतः विकसित केला आहे, जो नाविन्यपूर्ण, किफायतशीर आणि व्यावहारिक उपायांबद्दलची वचनबद्धता दर्शवितो. मध्य रेल्वे नेटवर्कमधील विविध पूर-प्रवण ठिकाणी, विशेषतः मुंबई उपनगरीय भागात हे उपाय लागू करण्यात आले, ज्यामुळे व्यापक सुरक्षा आणि वाढीव विश्वासार्हता सुनिश्चित झाली. पावसाळ्यात पुरामुळे पॉइंट मशीनमधील बिघाड कमी झाल्यामुळे परिचालन कार्यक्षमतेत सुधार झाला. या वाढीमुळे रेल्वेचे कामकाज सुरळीत आणि अखंडित राहण्याची खात्री झाली, ज्यामुळे पॉइंट्स आणि पेपर ऑथॉरिटी मॅन्युअल क्लॅम्पिंगची आवश्यकता नाहीशी झाली.
हे पुरस्कार नवोउपक्रमांची अंमलबजावणी आणि त्यांची उपयुक्तता याचा विचार करून दिले जातात. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यास, नाविन्यपूर्ण संस्कृतीला चालना देण्यास आणि रेल्वे व्यवस्थेतील विद्यमान आव्हानांवर संभाव्य उपाय शोधण्यात मदत करते आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.