पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी युक्रेनमधील सद्यस्थिती, द्विपक्षीय सहकार्य आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारयुक्त धोरणात्मक भागीदारी यावर सखोल चर्चा केली. यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना यावर्षी भारतात आयोजित होणाऱ्या भारत-रशिया वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांचा हा दौरा २३ ते २६ जुलै या कालावधीपर्यंत आहे.
भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार करार चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार गती मिळत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांमधील सुधारणा लक्षात घेतली. जयशंकर यांनी त्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत सकारात्मक वाटचाल कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक प्रतिष्ठा अधिक बळकट होताना दिसून येते.
अमेरिकेतील राजकारण प्रदीर्घ काळ डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांभोवती केंद्रित राहिले. मात्र, सध्या एलॉन मस्कसारख्या दिग्गज उद्योगपतीने नवीन पक्षस्थापनेची शक्यता निर्माण करून अमेरिकेत खळबळ माजवलेली दिसते. त्यानिमित्ताने अमेरिकेतील द्विपक्षीय राजकीय रचनेची मर्यादा, तिसर्या पक्षांची दुर्दशा आणि नव्या शक्तीच्या उदयाची शक्यता यांचे हे आकलन...
(Iran-Israel War) तेहरानच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणसोबत युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयाने पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Pakistan occupied Kashmir only issue bilateral talks with Pakistan
( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे.
भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्या द्विपक्षीय संबंधाला एक मोठा इतिहास असून, ते संबंध जसे राजकीय आहेत, तेवढेच सांस्कृतिकही आहेत. भारत आणि इंडोनेशिया यांच्या संबंधांचा घेतलेला हा आढावा...
शेख हसीना यांचा दोनदिवसीय भारत दौरा सर्वार्थाने चर्चेत राहिला. दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांवर, परराष्ट्र धोरणाविषयीही बरीच चर्चा रंगली. पण, या दौर्यामध्ये आणि एकूणच द्विपक्षीय चर्चांमध्ये बांगलादेशमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासंबंधीही कठोर पावले उचलणे अपेक्षित होते. कारण, दिवसेंदिवस भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही वाढताना दिसते. त्यानिमित्ताने भारतातील बांगलादेशी घुसखोरीचे वास्तव आणि त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात शनिवार, दि. २२ जून २०२४ द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-बांगलादेश परस्पर सहकार्याच्या दीर्घकालीन अजेंडाला अंतिम रूप दिले.
भारत आणि बांगलादेश यांनी शनिवारी सागरी क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देणे आणि ब्लू इकॉनॉमी यासह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात व्यापक चर्चेनंतर करारांना अंतिम रूप देण्यात आले. धोरणात्मक बाबी, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्यपालनावरील करारांचा समावेश आहे.
काल युएई व भारत यांच्यातील मैत्रीचा एक नवीन अध्याय पुढे सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व युएई अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयन यांच्यात' बायलॅटरल इन्व्हेसमेंट ट्रीटी' हा करार निश्चित झाला आहे. सामाजिक राजकीय मैत्री व्यतिरिक्त भारत युएई मधील आर्थिक देवाणघेवाण व आंतरदेशीय गुंतवणूकीला चालना देण्यासाठी हा बीआयटी करार संपन्न झाला आहे. यावर बोलताना विदेश मंत्रालयाने हा करार दोन्ही देशांत गुंतवणूक वाढवण्यासाठी चालना देईल असे यावेळी निवेदनात स्पष्ट केले आहे, तसेच हा बीआयटी करार दोन्ही देशांतील आर्थिक भाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारविनिमय करून द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आपल्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांत दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार गेल्यावर्षी करण्यात आला. त्याचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. हा आर्थिक भागीदारी करार द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे उप-पंतप्रधान डेनिस मँतुरोव्ह यांची गुरुवारी दि. १८ ऑगस्ट रोजी भेट घेतली आहे. अजित डोवाल दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर होते. बुधवारी दि. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी रशियन सुरक्षा सल्लागार निकोलाई पात्रुशेव यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी मॉस्कोमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून चर्चा केली.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अमेेरिका भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले आहे. अमेरिका आता चीनऐवजी भारताला व्यावसायिक महत्त्व देत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि.२४ रोजी टोकियोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष 'जो बिडेन' यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही विश्वासाची भागीदारी असल्याचे सांगितले.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले.
भारत आणि फिलिपिन्समध्ये झालेल्या द्विपक्षीय करारांतर्गत दोन्ही देश पारस्परिक व्यापारात वाढ करण्यावर तर भर देतीलच. पण, उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णयदेखील घेतील. तसेच दोन्ही देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यावरही सहमत झाले आहे. फिलिपिन्सचे व्यापार आणि उद्योग सचिव सेफरिनो एस. रोडेल्फो यांनी ‘पीटीए’चा दृष्टिकोन व्यवहार्य असल्याचे म्हटले.
पाकिस्तानकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन ; भारताने व्यक्त केली नाराजी
द्विराष्ट्र संबंधात मधुरता निर्माण झाल्यास त्रयस्थ राष्ट्रास ते खटकते आणि संबंधांत कटुता निर्माण होते. निर्माण झालेली कटुता ही पुन्हा माधुर्याचे स्वरूप धारणदेखील करत असते. असा संबंधांच्या हिंदोळ्यावर आंतरराष्ट्रीय संबंधांचा झुला कायमच झुलत असतो. सध्या भारताला या सर्वच अनुभवांची प्रचिती श्रीलंकेच्या रूपाने येत आहे.
अमेरिका – इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
ब्राझीलमधे ब्रासीलिया येथे आज सुरु होणाऱ्या ११ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स व्यापार फोरममधे उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांसमवेत मोठे व्यापार प्रतिनिधी मंडळही आज उपस्थित राहणार आहेत. आज या फोरमममध्ये आज होणाऱ्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य देशातील प्रतिनिधींशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भारत-आसियान शिखर परिषदेसाठी विविध नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेत आहेत. आज त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.
१२ जूनला सिंगापूरच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता ही भेट होणार असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, सागरी व्यापार आणि सुरक्षा, सायबर सुरक्षा, अवैध्या तस्करी, प्रशासन व्यवस्थापन आणि आर्थिक सहयोग या प्रमुख विषयांवर हे आठ करार करण्यात आले आहेत.
ट्रम्प यांनी स्वतः याविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जई इन यांच्यात आज सकाळी चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर याविषयी आपले मत व्यक्त केले.
आज इराण आणि भारत यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. व्हिसाबाबतच्या अटी भारतने शिथिल केल्या पाहिजे, अशी इराणची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू व्यापारात दोन्ही देशांत वाढ व्हावी हा देखील चर्चेचा मुद्दा असेल.
भारतीय संस्कृतीला त्यांनी अभिवादन केले. भारत आणि इस्त्राईल यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक साम्य असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.