पंतप्रधान मोदींनी घेतली जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भारत-आसियान शिखर परिषदेसाठी विविध नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेत आहेत. आज त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने काही विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व आशिया खंडात आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी परिषदेमध्ये देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. या शिखर परिषदेच्या निमित्ताने आशिया आणि पॅसिफिक या भागातील प्रमुखांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्व आशिया शिखर परिषदेत या प्रदेशातील विविध विकासाच्या बाबींवर चर्चा करण्यात येईल. आजच्या पूर्व एशिया शिखर परिषदेचे ध्येय ईएएस सहकार्याच्या भावी दिशानिर्देशाचा आढावा घेणे आणि क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा हे आहे. या परिषदेदरम्यान आसियान देशांमधील मुक्त व्यापाराच्या धोरणांविषयी देखील चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वृद्धींगत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असे पंतप्रधानानी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@