मुंबई (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि.२४ रोजी टोकियोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष 'जो बिडेन' यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही विश्वासाची भागीदारी असल्याचे सांगितले. भारत-अमेरिका संरक्षण आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहेत. दोन्ही देशांनी समृद्ध, मुक्त आणि सुरक्षित जगासाठी एकत्र काम करण्याची शपथ घेतली.
इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत दोन्ही देशांचे विचार समान आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. "आमच्या समान हितसंबंधांमुळे खरोखरच दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास मजबूत झाला आहे. आम्ही आमचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वाढवत आहोत, परंतु तरीही ते संभाव्यतेच्या अगदी कमी आहेत," तसेच भारत आणि अमेरिका तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "मला विश्वास आहे की 'यूएस गुंतवणूक प्रोत्साहन करारा'मुळे, आम्हाला आमच्या दोन्ही देशांमधील गुंतवणुकीत उत्तम प्रगती दिसेल. आम्ही तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य देखील वाढवत आहोत," असे पंतप्रधान म्हणाले.