नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अमेेरिका भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार असल्याचे समोर आले आहे. अमेरिका आता चीनऐवजी भारताला व्यावसायिक महत्त्व देत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये अमेरिकेचा द्विपक्षीय व्यापार ११९.४२ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. जो २०२०-२१ मध्ये ८०.५१ अरब डॉलर इतका होता. तसेच २०२१-२२ मध्ये भारताची अमेरिकेला निर्यात ७६.११ अरब डॉलर इतकी होती. जी याआधी ५१.६२ अरब डॉलर होती.
आर्थिक संबंध आणखी सुधारेल
भारतीय निर्यात संगठन महासंघचे उपाध्यक्ष खालिद खान यांनी भारत एक विश्वासू व्यापारी भागीदार स्वरूपात समोर येत असल्याचे म्हटले आहे. वैश्विक कंपन्या चीनवर असलेली निर्भरता कमी करत असून भारतासोबतच इतर देशांसोबत व्यापार करत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार वाढेल व भारत-अमेरिका हिंद-प्रशांत आर्थिक रूपरेषामध्ये समाविष्ट होईल. ज्यामुळे आर्थिक संबंध सुधारेल, अशी आशा खालिद खान यांनी व्यक्त केली आहे.