महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ मध्ये 'मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड' योजना राबविण्यात येणार असून याद्वारे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Read More
(Mangal Prabhat Lodha) दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या राडाप्रकरणात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. बुधवारी ६ ऑगस्टच्या सकाळी कबूतरखान्याजवळ गोंधळ घालणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे लोक बाहेरचे असल्याचे मंत्री लोढा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कबुतरखाना बंद केल्याप्रकरणी दादरमधील कबुतरखाना परिसरात बुधवार, ६ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन करण्यात आले. कबुतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकत काही महिला आंदोलनकर्त्यांनी कबुतरांना खायला दिले. यावेळी कबुतरखाना परिसरात मोठी गर्दी जमली होती.
श्रावण म्हणजे विविध व्रतवैकल्यांचा महिना. यामध्ये नववधूंसाठीचे व्रत म्हणजे मंगळागौर होय! श्रावण महिन्याच्या मंगळवारी हे व्रत केले जाते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी नवपरिणीता महिला हे व्रत करतात. दिवसभर उपवास करून, मंगळागौरीचे पूजन केल्यानंतर रात्रभर मंगळागौर जागवली जाते. त्यानिमित्ताने फुगड्यांपासून पारंपारिक नृत्यांचे सादरीकरणही होते. अनेक खेळ खेळले जातात. याच मंगळागौरी व्रताची महती सांगणारे श्रावणगाथेतील हे तिसरे कथापुष्प...
कबुतरांचा आणि कबुतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यांसंदर्भात पालकमंत्री मंगल प्रभात लोढ़ा यानी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलंय. या पत्रात लोढा काय म्हणालेयत? या प्रश्नावर मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे? उच्च न्यायालयाने काय म्हटलंय? कबुतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय? स्थानिक लोकांचे काय म्हणणं आहे? यासंदर्भात पेटाची भूमिका काय आहे? डॉक्टरांचं म्हणणे काय आहे?
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा ; आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दिले. कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नवउद्योजकांना सक्षम करण्याच्या हेतूने ५ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली असून या धोरणाची अधिकृत अंमलबजावणी घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. तसेच ही पुढील पिढीच्या नवउद्योजकांसाठी नवी दिशा असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची परीक्षा पुन्हा होणार असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जुलै २०२५ सत्राची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश जारी केले आहेत.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे केवळ २ हजार र
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात येणाऱ्या दंडाबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. बुधवार, ३० जुलै रोजी महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने शुक्रवार, २५ जुलै रोजी वरळी येथे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात ३२२ तक्रारींचे १०० टक्के निवारण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली. या १०२ मेळाव्यांमधून २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला. राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी...
मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करा तसेच शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा, अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १७ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
हमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI 171 च्या भीषण अपघातात गुरुवार, दि.१२ जून रोजी,२६५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. जखमींचा आकडाही जास्त आहे. या अपघातावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करावी, अशी मागणी दोन डॉक्टरांनी भारताचे सरन्यायाधीश यांना लिहिलेल्या एका पत्रात केली आहे.या पत्रात त्यांनी पीडितांच्या कुटुंबांना त्वरित आणि सन्मानजनक भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘आरजी कर केस’ प्रकरणी व्हिडिओ तयार करताना ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचे छायाचित्रण वापरले म्हणून मोहक मंगल या युट्यूबर विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगल यांच्यावर ‘एएनआय’ने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला असून त्याविरोधात दंड म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली होती.
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार, २० मे रोजी वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांची विशेष 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत हजारों महिलांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली.
( Minister Mangal Prabhat Lodha on Startup ) एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होत. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे असे प्रतिपादन, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित "टेक वारी" कार्यक्रमात केले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार
राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री चौधरी यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी मंत्रालयात कौशल्य विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
( Minister Mangal Prabhat Lodha on inauguration ceremony of unnat marg ) निसर्गाचा समतोल राखत बृहन्मुंबई पालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल.
दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय एलिव्हेटेड नेचर ट्रेलच्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे.
मंगला मिरवणूक झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मंगला मिरवणुकीदरम्यान, दोन समुदयांमध्ये संघर्ष उफाळून आल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांवर दमगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हजारीबागचे एसपी घटनास्थळी होते आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना २५ मार्च रोजी मंगळवारी रात्री घडली असल्याची माहिती आहे.
( Chief Minister's favorite department is the Skill Development Department Mangal Prabhat Lodha ) महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावास उत्तर देताना राज्यातील युवा उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव
Mangal Roy Firing पंजाबमधील मोगामध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. . ही घटना शुक्रवारी १४ मार्च २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यात आला त्याच्या खांद्यावर शिवसेना पक्षाचे उपरणे परिधान करण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या दिवशी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. अपूर्वा पालकर लिखित 'एआय अनझिप्ड' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
Mangal Prabhat Lodha महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील १ लाखाहून अधिक लाभार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
Mangal Prabhat Lodha महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीसयांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे.
Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा
आज दि. ११ फेब्रुवारी... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ५७वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने दीनदयाळजींनी मांडलेल्या ‘एकात्म मानवतावाद’ या चिरंतन तत्त्वज्ञानाचे हे चिंतन...
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या ( Skill Development Department ) बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.
नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील, विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्ट्यांमधील कुपोषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी 'अॅक्शन प्लॅन' आखला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाला दिली.
मुंबई: मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी रामनामाचा मफलर घालून संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
दादरमधील ( Dadar ) हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भातील नोटिशीला रेल्वे मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. तमाम हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या भावना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवला. या भावनांचा आदर करीत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित नोटिशीला स्थगिती दिली.
(kurla) कुर्ला येथे सोमवारी ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई : मलबार हिल मतदार संघातीचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Lodha ) यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंगल प्रभात लोढा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली. आज भारताचा विश्वगुरु म्हणून उदय होत असताना या प्रवासात संत शक्ती आणि सज्जन शक्तीचे योगदान उल्लेखित करण्याचा उद्देश मंगल प्रभात लोढा यांनी साध्य केला.
मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.
मुंबई : आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा (वय ४५) यांचे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले. रांची येथील ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (रिम्स) रुग्णालयात त्यांनी मध्यरात्री १२.३० वा. अखेरचा श्वास घेतला. मंगल मुंडा ( Mangal Munda ) यांचे बंधू कानू मुंडा यांनी सोशल मीडियावरून निधनाची वार्ता दिली.
मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित 'संविधान सन्मान रॅली २०२४' मध्ये मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी सक्रीय सहभाग घेतला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी डॉ. आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंचाद्वारे आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले!