मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता मराठीतून पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार आहे. संसदीय राजभाषा समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Read More
ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .आषाढी एकादशीनिमित्त, कल्याण चैरिटी ट्रस्ट, सेंच्युरी रेऑन, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेऑन हायस्कूल यांनी भव्य ज्ञान दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानदिंडी सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेतले.
निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेची जाणीव असलेल्या श्री विठोबा-रुक्मिणीच्या भक्तीवर आधारित ज्ञान दिंडी रविवारी सकाळी काढण्यात आली होती. निमित्त होते ते आषाढी एकादशी चे.
आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. सं
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून त्यासोबतच ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेतून आरोग्य जपणुकीचा संदेशही प्रसारित करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करावे येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहयोगाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. 600 हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांच्या
अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी मुंबई साहित्य परिषद आणि योग विद्या निकेतन आयोजित महाकवी कालिदास दिनानिमित्त पाऊस माझा तुझा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ जून रोजी हा कार्यक्रम नवी मुंबई येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद साहित्यिक पत्रकार दुर्गेश सोनार यांनी भूषवले. नंदकिशोर जोशी ,अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
हिंदुंचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित उमराळे, करमाळे येथील उमादेवी मंदिर विश्वस्त व उमराळे करमाळे जेष्ठ नागरिक संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने काल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी उमराळे येथील उमादेवी मंदिरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
" छत्रपती संभाजी महाराजांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रुचा बिमोड केला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याची लखलखती तलवार. " असे प्रतिपादन कादंबरीकार, लेखक विश्वास पाटील यांनी केले आहे. नॅश्नल लायब्ररी वांद्रे आयोजित ' नाते जीवा शिवाचे' या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला नॅश्नल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता दिनो मोरियाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीशी त्याचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले असून आता याप्रकरणी त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
( 287th Vasai Vijayotsav Din ) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यात वनरवाडी गावात बुधवार दी.२३ एप्रिलच्या सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पायल चव्हाण २१ वर्षीय युवती शेतात गवत कापयचे काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. कुणालाही काही समजायच्या आत बिबट्याने पायलला जवळपास 6 ते 7 फूट फरफटत नेले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या (पुणे) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
लेखक, कवी किरण येले यांनी ’बाईच्या कविता’ या आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून स्त्रीच्या संवेदनशीलतेचा एक अनोखा पट वाचकांसमोर उभा केला. एक दशकापेक्षा अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आता ’बाईच्या कविता’चा पुढचा भाग ’बाई बाई गोष्ट सांग’ अर्थात ‘बाईच्या कविता २’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त बाईच्या कविता लिहिणार्या या अनोख्या पुरूषाची गोष्ट...
ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्यादेखील उंचावते आहे. आर्थिक परिस्थिती नसताना पालक आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, भाषेत उदरनिर्वाहाची असणारी क्षमता, भाषेमुळे मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी कारणीभूत आहेत. नोकरी मिळण्याची क्षमता एखाद्या भाषेच्या अंगी कशी येते, याचा शोध घेऊन मराठीला त्यादिशेने पावले टाकण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर मराठी ही शासकीय भाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी तिचा प्रभावी वापर संपूर्णपणे रूढ झालेला नाही. इंग्रजी शब्दप्रयोग अजूनही सरकारी लिखाणात आणि संभाषणात सहजगत्या घुसखोरी करताना दिसतात. उदाहरणार्थ, मीटिंग, डिपार्टमेंट, ऑफिस, अटेन्डन्स, सर्क्युलर असे शब्द सहज वापरले जातात, जे बैठक, विभाग, कार्यालय, हजेरी, परिपत्रक असे सहजपणे मराठीत बदलता येऊ शकतात.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली आणि समस्त मराठी जनता सुखावून गेली. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच ही गोष्ट साजरी केली. मात्र, अभिजात दर्जा मिळल्यानंतर नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे, याचा विचार फार कमी तरुणांनी केला असेल, असे आपल्या आसपासचे वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. परंतु, मराठी भाषेच्या श्रेष्ठत्वासाठी काम करताना सर्व क्षेत्रांत ती उपयोगांत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळणे हा एक मूलभूत हक्क आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रिया ही बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत चालत असल्याने, अनेक मराठी भाषकांना न्याय मिळवताना अडचणी येतात आणि भाषा म्हणून मराठी केवळ टिकवण्यासाठीच नाही, तर तिला समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. याच पार्श्वभूमीवर, न्यायव्यवस्
अलीकडच्या काळात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठीसुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये सकस साहित्यनिर्मिती होते. हे साहित्य वाचणारा चांगला वाचकवर्ग मराठीच्या नशिबी आहे. येणार्या काळात आपल्या अभिजात मराठीचा वाचकवर्ग वाढेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
Marathi Bhasha Gaurav Din मराठी विषयात एम.ए. करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम.ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक त
मागील वर्षीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करताना ‘एआय’च्या युगात मराठी यावर विचार करणे विशेष आवश्यक ठरते.
(Sunil Tatkare) मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी रोजी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
विश्वप्रवक्ते आणि उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आपल्या नावे नवीन पराक्रम केला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा पराक्रम संजय राऊत आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी करण्याचे काम केले. माजी मंत्री आणि दिंडोरीच्या तत्कालीन खासदार भारती पवार यांनी निवडून आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. प्रसंगी कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी नागरिकांसमोरच अधिकार्यांना जाब विचारला. त्यामुळे भारती पवारांच्या कामावर जनता समाधानी होती. अनेक वर्षांपासून रें
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी केलेला सत्कार सध्या चर्चेत असतानाच आता या सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरेंचा खासदार उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. उबाठा गटाच्या संजय दिना पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणार्या व व्यक्तिमत्त्व विकासाचे नवे दालन उपलब्ध करून देणार्या, दिनेश मोरे यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.
मुंबई : सहकारी पतसंस्थांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ( Maharashtra State Cooperative Bank ) दि. १ फेब्रुवारी रोजी सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. पुस्तकरुपी दिंडीचे राज्य बँकेत स्वागत केले गेले. यावेळी सहकारी दिंडीतील कार्यकर्त्यांना सहकाराची शपथ दिली गेली. यामध्ये काका कोयटे यांना १० लाखांचा धनादेश देण्यात आला.
मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती, महाराष्ट्र आयोजित रौप्यमहोत्सव पालखी सोहळा दि. ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. कॉटनग्रीन येथील राम मंदिरातून सकाळी ८ वा. ही दिंडी ( Warkari Dindi ) सुरु करण्यात आली. मुंबईतील कॉटनग्रीन, परळ गाव, भोईवाडा, नायगाव असे पायी चालत वारकरींनी प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आपल्या दिंडीची सांगता केली. तीन हजार पेक्षा जास्त वारकरी या दिंडीत, व पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
D. Gukesh भारताच्या मुकेश डोम्मराजूने सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास रचला आहे. १८ वर्षीय गुकेशने अंतिम फेरीत डिंग लिरेनला पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून त्याने जागतिक पातळीवर विक्रम केला आहे. मात्र आता याच गुकेशला किती बक्षीस मिळाले याची आता अनेकांना उत्सुकता लागली आहे.
मुंबई : कांदिवली पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा फॉर्म भरण्यासोबतच प्रचाराला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कांदिवलीत प्रचाराचा झंजावात उभा केला. दि. २४ ऑक्टोबर रोजीपासून ते सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत त्यांनी कांदिवलीत १६ हून रथयात्रा, २० हून पदयात्रा, असंख्य स्थानिक भेटी आणि संवाद, तीन जाहीर सभा, खुल्या चर्चा अशा सर्व माध्यमांतून प्रचार केला.
( Raj Thackeray ) दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. तसेच वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही त्यांनी टीका केली आहे.
Aakash Maeen Death : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दत्तात्रय माईन आणि दीपाली यांचा मुलगा आकाश माईनचा रिक्षाचालकांशी झालेल्या भांडणात दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली असून घटनेच्या दिवशी संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण होते. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडतो. दरम्यान महाराष्ट्र शासनाने समितीच्या कार्याची दखल घेतल्याने यंदा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयाने हा सोहळा दि. २८ जुलै २०२४ रोजी पार पडणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे दि. ९ जून २०२४ रोजी हिंदू यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यात नऊ यात्रेकरू ठार झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या तपासादरम्यान स्थानिक व्यापारी हकम दिन (४५) याने दहशतवाद्यांना मदत केल्याचे समोर आले आहे. अवघ्या ५००० रुपयांसाठी हकम दिनने देशाचा विश्वासघात केला.
शुक्रवारी SNDT महिला विद्यापीठ आणि कैवल्यधाम योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट आवारात उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून २०२४ रोजी कैवल्यधामच्या योग प्रशिक्षकांनी योग प्रोटोकॉलचे संचालन केले. यामध्ये कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. कविता खोलगडे यांनी सहभाग घेतला. तसेच एलटी नर्सिंग कॉलेजच्या ५० मुलींनी सक्रिय यात सहभाग घेतला. कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, डॉ. कविता खोलगडे आणि मुलींनी विविध आसने आणि योगासने केली
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....
गेल्या १० वर्षात मोदी सरकारने लघू , सूक्ष्म, मध्यम उद्योग (MSME) यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यापासून विविध आर्थिक सहाय्य सरकारने विविध योजनांतर्गत केले होते. आता एसबीआय (State Bank of India) ने पुढाकार घेतला असून छोट्या व मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा तत्काळ करण्याचे ठरवले आहे.