उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्काराला ठाकरेंचा खासदार!

    13-Feb-2025
Total Views |
 
Sanjay Dina Patil
 
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी केलेला सत्कार सध्या चर्चेत असतानाच आता या सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरेंचा खासदार उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. उबाठा गटाच्या संजय दिना पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
 
मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी शरद पवारांनी शिंदेंचे तोंडभरून कौतुकही केले. पंरतू, शरद पवारांनी शिंदेंचा सन्मान केल्याने आम्हाला वेदना झाल्या असल्याचे सांगत संजय राऊतांनी थयथयाट सुरु केला. तसेच त्यांनी शरद पवारांवर टीकाही केली.
 
मात्र, आता उबाठा गटाचे खासदार संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर या कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे उबाठा गटातील नेते संजय राऊतांना गांभीर्याने घेतात का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.