( including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
Read More
(Beed Case ) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
(Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
(Santosh Deshmukh) बीड-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला मात्र अद्याप या प्रकरणातील एका आरोपी फरार आहे. तसेच अटकेत असणाऱ्या इतर आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने संतप्त मस्साजोगकरांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे.
(Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
(Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
( Beed Case ) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हवेत गोळीबार करून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
(Dhananjay Munde) अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात हजर झालेले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळ बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना राजीनाम्यावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही", असे त्यांनी स्पष्ट केले.
(Dhananjay Munde) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमदार धसांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी ३१ डिसेंबरला पुणे सीआयडी मुख्यालयात शरण आला. शरणागतीनंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
(Sudarshan Ghule) सीआयडीच्या कारवाईनंतर खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना मंगळवारी ३१डिसेंबरला सीआयडीच्या पुणे मुख्यालयात शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले हा शरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे आता गावातील पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे, असा अध्यादेश ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
बाल विवाह संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात होता. पण आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाल विवाह केला जाईल. त्या सरपंचासह नोंदणी करणा:या रजिस्टारच्या विरोधातही गुन्हा दाखल केला जाईल. एवढेच नाही तर सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
सरपंच परिषदेचा सातारा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच लोकप्रतिनिधी नाही का?
सर्व न्यायाधीश महोदयांचा हेतू चांगलाच आहे, पण त्यांच्या वक्तव्यातून पंतप्रधानांपासून ते गावच्या सरपंचापर्यंत एक प्रकारचा अविश्वास जाणवतो. यांनीच जर असा अविश्वास व्यक्त केला, तर सामान्य नागरिक काय करतील?
भारत हा खेड्यांचा देश आहे, अशी ऐतिहासिक धारणा आपण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून बाळगत आलो आहोत. त्यामुळेच भारतातील खेडी ही स्वयंपूर्ण बनावी, लोकशाही ही तळागाळापर्यंत पोहोचावी, यासाठी भारतात पंचायतराज व्यवस्था अमलात आणण्यात आली.
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाची रणधुमाळी राज्यभर सुरु आहेत, पण ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारचा निर्णय ; विरोधी पक्षाची सरकारवर सडकून टीका
‘महाविकास आघाडीचा’ लोकशाहीविरोधी डाव फसला
४८ तासातील दुसरी घटना ; जम्मू काश्मीरमधील भाजप नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
सरपंचांना पोलिस संरक्षण घेण्याचे आवाहन
एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रस्तावाला मान्यता
नाशिकमधील एकलहरे गावच्या महिला सरपंच मोहिनी जाधव यांनी आपले दागिने गहाण ठेवून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार दिला आहे.
भाजपने बहुमताने विजय मिळवत भरघोस यश संपादन केल्याने एकूणच या निवडणुकीतही भाजपचा करिष्मा पाहायला मिळाला.
गेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.