स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच लोकप्रतिनिधी नाही का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

sarpanch parishad_1 
मुंबई: जर ग्रामपंचायत ही संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थेत येत असेल तर विधानपरिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीसाठी सरपंचाला मतदानाचा अधिकार का नाही? असा प्रश्न मुंबई महाराष्ट्र सरपंच सरपंच अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि प्रदेश सरचिटणीस ॲड.विकास जाधव यांनी परिषदेच्यावतीने निवडणूक आयोगाला केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या मतदारसंघ आहे. प्रत्येक जिल्हापरिषद, नगरपरिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या सभापती व नगरपरिषदाचे नगरसेवक आणि जिल्हापरिषदेचे सदस्य यांना त्यामध्ये पूर्वीपासून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ग्रामपंचायतींवर निवडणून आलेले सरपंच उपसरपंच हेदेखील जनतेतून निवडून दिलेले असतात. पंच्यात समितीचे सदस्यही जनतेने निवडून दिलेले असतात. या सर्व लोकल बॉडी आहेत. आणि यासर्व लोकल बॉडीवर निवडणून आलेले सदस्य हे विधानपरिषदेच्या निवडणुकींमध्ये मतदार म्हणून पात्र आहेत. अशी कायद्यात तरतुदी आहे.परंतु आजपर्यंत कोणत्याही राज्य सरकरने किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी याकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच आणि उपसरपंच हे विधानपरिषदेच्या मतदारसंघासाठी मतदान करण्यासाठी मतदार म्हणून वंचित राहिले. त्यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी खंत सरपंच परिषदेने व्यक्त केली आहे.


पुढे बोलताना ऍड. विकास जाधव म्हणाले, मात्र सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही याचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. आम्ही राज्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य निर्णय निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालये येथे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही आता केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहोत. जर आम्हाला मतदाराचा हक्क दिला नाही तर आम्ही याविरोधात आवाज उठवणार आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत. जोपर्यंत ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच, उपसरपंच यांना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेत मतदानाचा हक्क मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहणार, असेही सरपंच परिषदेने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@