सरपंच परिषदेचे काम ग्रामविकासासाठी ठरणार दिशादर्शक: पद्मश्री पोपटराव पवार

सरपंच परिषदेचा सातारा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न

    01-Dec-2021
Total Views |

satara_1  H x W



सातारा :
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रने ग्रामपंचायतीची सुरू केलेली चळवळ ग्रामहिताची असून सरपंच,उपसरपंच घटकाला दिशादर्शक ठरनार आहे.या कार्यसाठी मी सदैव सरपंच परिषदे बरोबर असनार आहे,असे वक्तव्य ग्रामविकासाचे प्रणेते व पद्मश्री पोपटराव पवार यांनी साताऱ्यातील सरपंच परिषदेच्या जिल्हा मेळाव्यात केले.

यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस अँड.विकास जाधव,राज्य विश्वस्त आनंदा जाधव परिषदेचे जिल्हा अध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन काका पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अरूण कापसे, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष समाधान पोकळे जिल्हा सरचिटणीस शत्रुघ्न धनावडे महिला जिल्हा समन्वयक अरुणाताई जाधव यांचेसह सर्व पदाधिकाऱी व सातारा जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांना पद्मश्री मिळाल्या बद्दल सातारा जिल्हा सरपंच परिषदेच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


पोपटराव पवार पुढे बोलताना म्हणाले की,सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना न्याय देणारे व ग्रामीण महाराष्ट्रासाठी उपयुक्त असलेले काम सध्या सरपंच परिषदेचे चालू आहे. त्यांच्या पाठीशी सबंध महाराष्ट्रातील सरपंचांनी खंबीरपणे उभारावे असेही त्यांनी आवाहन केले. त्या बरोबरच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी आदर्श गाव निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची गरज आहे .सरपंच हा ग्रामविकासातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे सरपंचाने गावात पक्षभेद मतभेद विसरून सर्वांचीच कामे करावी, असेही यावेळी पोपटराव पवार यांनी सांगितले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासोबत सातारा जिल्ह्याच्या वतीने परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व ऍड विकास जाधव यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सोबतचा सन्मान माझ्या वरील व दत्ताभाऊ वरील जबाबदारी वाढणारा तसेच ती जबाबदारी पेलण्यासाठी बळ देणारा आहे.असे अँड विकास जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सरपंचाच्या हक्काचे संरक्षण
सरपंचाच्या हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने स्विकारली असून त्यांच्या पदाचे महत्व व पदाचा मान व सन्मान वाढवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहोत.व यातून ग्रामविकासाचे हित जोपासण्याचा संदेश आम्ही राज्यातील गावो गावो पोहचवत आहोत.या साठी पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.
- दत्ता काकडे
प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र
सरपंचानाही मतदानाचा अधिकार मिळावा
स्थानिक स्वराज्य विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणूकीत सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना देखील मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे.सरपंच हा लोकप्रतिनिधी नाही का ? जो पर्यंत मतदानाचा अधिकार मिळत नाही तो पर्यंत सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.
- ॲड विकास जाधव
प्रदेश सरचिटणीस, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र
सरपंच परिषदेच्या एकजूटीचा विजय
स्ट्रीटलाईटच्या लाईट बिल शासनाने अदा करण्याचा निर्णय हा सरपंच परिषदेच्या एकजूटीचा विजय आहे येथून पुढेही सरपंचासाठी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करू.
- नितिन पाटील
सातारा जिल्हा अध्यक्ष, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र