डोंबिवली : तेरापंथ धर्मसंघाचे युगप्रधान आचार्य महाश्रमण यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतात एकाच दिवशी डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये डोळ्यांचे विकार, डोळ्यात मोतीबिंदू, डोळ्यांची निगा राखणे, डोळ्यांसाठी पोषक आहार व इतर आजारांचाही डोळ्यांवर कसा परिणाम होतो या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
या शिबिरात शहरातील नामवंत नेत्र तज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन केले गेले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कळवा, भिवंडी, दीघा या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना पुढील ट्रीटमेंट ची आवश्यकता आहे अशांचीही वेगळी नोंद करण्यात आली. ज्यामुळे भविष्यातील दहा ते तेवीस वयोगटातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील विविध समस्यांवर अभ्यास व उपाय योजना करता येईल. जसे विद्यार्थ्यांचे अंधारात तासनतास मोबाईल बघणे, चॅटिंग करणे, सतत गेम खेळणे, नको ते विकृत व्हिडिओज बघणे यासाठी शासनाला विशेष उपाय योजना करता येईल. आचार्य श्री महाश्रमणजी यांचा दृष्टिकोण हा देशाच्या विकासात जैन समाजाचा मोलाचा वाटाअसावा हाच आहे असा आहे. राष्ट्राच्या विकासासोबतच मानव कल्याणाची सामाजिक जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे.तेरापंथ प्रोफेशनल फोरम या संस्थेच्या मार्गदर्शनाने ठाणे विभागात 11 शाळांमध्ये पाचवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हा कॅम्प आयोजित केला गेला. त्यामध्ये 5408 विद्यार्थ्यांची तपासणी झाली. ज्यांना पुढील ट्रीटमेंट ची आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांच्या पुढील ट्रीटमेंटचीदेखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यामध्ये डोंबिवलीतील जनगणमन स्कूल व ज्युनियर कॉलेज, वंदे मातरम सीनियर कॉलेज, एम के वाणी विद्यालय, शंकरा विद्यालय, केबी वीरा विद्यालय यांचाही समावेश आहे.
प्रत्येक शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही मोलाचा सहभाग मिळाला. संबंधित डॉक्टर्स,त्यांची टीम,ठाणे प्रोफेशनल फोरम चे अध्यक्ष अविनाश गोगड़,मंत्री सीए रवि जैन,संयोजक श्रेयांश धारीवाल यांच्यासह डोंबिवली शिबिराच्या सफलतेसाठी डॉ नम्रता परमार, अमन सोनी, प्रियंका परमार, दिव्या सोनी, नीता ओस्तवाल, सपना मेहता, किरण कोठारी, डॉ. दिलीपसिंग मुनोत , संयम मुनोत, हेमलता मुनोत आदींनी अथक परिश्रम केले.