कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

    09-May-2025
Total Views | 132

INS Vikrant Karachi Port Update

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (INS Vikrant Karachi Port)
जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तान सरकारने अपेक्षाही केली नसेल. यावेळी १०० नाही तर थेट ३०० किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताकडून मोठे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौके आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आले असून कराची बंदरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर मोठा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकृत वृत्त आले नसले तरी, जर अशी कारवाई झाली असेल तर ही एकाअर्थानो भारतीय नौदलाच्या इतिहासातील मोठी कारवाई निश्चितच म्हणता येईल.

हे वाचलंत का? : असीम मुनीरची हकालपट्टी? जनरल शमशाद मिर्झा नवे लष्करप्रमुख?

जर नौदलाने असा हल्ला झाला असेल तर, १९७१ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच भारतीय नौदलाने कराचीसारख्या शहरावर हल्ला केला आहे. कारण कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. असेही सांगण्यात येतेय की, या हल्ल्यात अचूक क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या समुद्रातून सोडण्यात येणाऱ्या शस्त्रांचा वापर यावेळी करण्यात आला होता. भारताने ज्या शहरांवर हल्ला केला आहे त्यात इस्लामाबाद, लाहोर, कराची, सियालकोट, पेशावर, बहावलपूर यांचा समावेश आहे.

अशातच कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअल नामक एक्स हॅण्डलवरून एक पोस्ट करण्यात आलीय जी अनेकांचे लक्ष्य वेधून घेतेय. 'भारताच्या हल्ल्यामुळे कराची बंदराचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे मालमत्तेचे अस्वीकार्य नुकसान झाले आहे. आपत्कालीन प्रतिसादाचे प्रयत्न सुरू आहेत. पुनर्संचयनाबाबतचे अपडेट्स नियमितपणे दिले जातील.'


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121