पाकिस्तानी नेत्यांच्या मुर्खपणाचा कळस! AIद्वारे तयार केले टेलिग्राफ वृत्तपत्राचे कात्रण फॅक्ट चेकमध्ये झाली इशाक दार यांची पोलखोल
16-May-2025
Total Views | 22
नवी दिल्ली : ( pak ishak Dar exposed ) पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा आणखी एक बुरखा फाडण्यात आला आहे. भारताच्या कारवाईचे पुरावे द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर पाकिस्तानच्या उपपंतप्रधांनांनी मुर्खपणाचा कळसच गाठला आहे. पाकचे मंत्री इशाक दार यांनी यूकेतील वृत्तपत्र असलेल्या ‘द डेली टेलिग्राफ’च्या पहिल्या पानाची बनावट प्रत तयार केली. ज्यात पाकिस्तानच्या हवाई दलाचे कौतूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
दि १५ रोजी पाकिस्तानच्या सिनेटला दिलेल्या भाषणात उपपंतप्रधान दार म्हणाले, "टेलीग्राफ वृतपत्राने पाकिस्तान हवाई दल हा आकाशाचा निर्विवाद राजा", असे म्हटले आहे. दार यांनी भाषणा दरम्यान दाखवलेले वृत्तपत्राचे पान सोशल मीडियावर व्हायरल होताच ते बनावट खोटे असल्याचे समोर आले.
भारतासोबतच्या युध्दतणाव पार्श्वभूमीवर ‘द डेली टेलिग्राफ’ वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पाकिस्तान हवाई दलाला "आकाशाचा राजा" म्हटलेल्या पोस्ट पाकिस्तानी सोशल मीडियावर करण्यात आल्या होत्या. मात्र, याची सत्यता पडताळल्यावर कुठल्याही प्रकारची बातमी छापली गेली नसल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानचे मंत्री इशाक दार यांच्या या खोटारडेपणाचा बुरखा पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’नेही फाडला आहे. या वृत्तपत्राने केलेल्या पडताळणीत अशा प्रकारे कुठल्याही बातम्या छापून आल्याचे आढळलेले नाही. हे संपूर्ण प्रकरण बनावट आणि खोटे असल्याचे उघडकीस आले. भारताच्या पीआयबी फॅक्ट चेकनेही याची पोलखोल केली आहे.
युकेतील एका वृत्तपत्राच्या नावाखाली चालविला जाणाऱ्या बातमीचे हे कात्रण एआयचा वापर करुन तयार करण्यात आल्याचे पीआयबीने सांगितले आहे. भारत सरकार संदर्भातील खोट्या बातम्यांची पोलखोल करण्याचे काम पीआयबी फॅक्ट चेक करत असते.