मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती.
२० दिवसांनी बिग बींची प्रतिक्रिया
पाहलगाम हल्ल्याला २० दिवस आणि ऑपरेशन सिंदूरला पाच दिवस उलटून गेल्यानंतर अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एक्स (एक्स ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट शेअर करत सैन्याला सलाम केला आणि दहशतवाद्यांचा निषेध केला. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील काही ओळींचाही उल्लेख केला आहे.
T 5375 - छुट्टियाँ मानते हुए, उस राक्षस ने, निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद , उसे जब गोली मारने लगा, तो पत्नी ने, घुटने पे गिर कर, रो रो अनुरोध करने के बाद भी, की उसके पति को न मारो ; उसके पति को उस बुज़दिल राक्षस ने, बेहद…
“सुट्ट्यांचा आनंद साजरा करत असताना त्या राक्षसाने त्या निरागस जोडप्याला घराबाहेर खेचलं. नवऱ्याला कपडे काढायला लावले. आणि त्याचं कर्तव्य पूर्ण करून त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. पत्नीने गुडघ्यावर बसून, अश्रू ढाळून विनंती केली – ‘माझ्या नवऱ्याला मारू नका!’ पण त्या भेकड राक्षसाने निर्दयतेने तिच्या नवऱ्याला गोळ्या घालून तिचं संसारस्वप्न उद्ध्वस्त केलं.
पत्नी म्हणाली, ‘मग मलाही मारा!’
राक्षस म्हणाला – ‘नाही! तू जा... आणि हे सगळं तुझ्या लोकांना सांग!’
त्या मुलीच्या मानसिक स्थितीवर माझ्या पूज्य बाबूजींच्या कवितेतील ओळ आठवली –
‘जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!’
...आणि मग कोणीतरी तिला तो सिंदूर दिला!”
'अग्निपथ'च्या ओळींचाही उल्लेख
याच पोस्टमध्ये बच्चन यांनी आपल्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील गाजलेल्या ओळीही लिहिल्या:
“ऑपरेशन सिंदूर!!! जय हिंद! जय हिंद की सेना!
तू न थमेगा कभी, तू न मुडेगा कभी,
तू न रुकेगा कभी, कर शपथ, कर शपथ...
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!!!”
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना समजून घेत त्यांचं समर्थन केलं असून, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याची एकसंध भावना सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.