ठाणे: ( Ravindra Prabhudesai thane satkar ) उद्योग क्षेत्रासह समाजकारण व अध्यात्मामध्ये विशेष योगदान देणार्या रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठाणेकर प्रभुदेसाई यांचा सन्मान हा आपल्या ठाण्याचा गौरव आहे. ठाण्याची प्रतिष्ठा वाढवून उद्योजकतेच्या बहुमानानिमित्त डॉ. प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड 2, ठाणे (प) येथे गुरुवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विशेष पाहुणे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, संशोधक ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर, आ. संजय केळकर, चितळे बंधूचे पार्टनर श्रीकृष्ण चितळे, हिंदुत्व व अध्यात्माचे उपासक, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे आयोजक नागरी अभिवादन सत्कार समिती, ठाणे यांनी कळविले आहे.