अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, समाजकंटकांची धर्मस्थळाला अपवित्र म्हणण्याची हिंमत

    09-Mar-2025
Total Views |

 Hindu temple 
 
वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करत हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहचवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच मंदिराला अपवित्र म्हणण्याची त्यांनी हिंमत केली आहे. या घटनेवर भारत नाराजी व्यक्त केली असून संबंधित घटने प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, हे अज्ञातांनी कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या प्रकरणी आता कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, कॅलिफोर्नियातील चिनो हिल्समधील आणखी एका मंदिराची विटंबना करण्यात आली. हिंदू समुदाय या घडलेल्या घटनेविरोधात उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील समुदायासोबत, आम्ही द्वेषाला कधीही द्वोष होईल असे राहणार नाही. मानवता, श्रद्धा, शांती आणि करुणेला जागरूक ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.
 
 
 
या संबंधित घटनेची नोंद घेत भारतानेही याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य केले आहे. अशा कृत्याचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करतो. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना संबंधित कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना जागा दाखवू.
 
अशातच, याआधीही अमेरिकेत हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची घटना आहे. मंदिरांवर हिंदू नागरिकांच्या विरोधात संदेश लिहिण्यात आले आहेत.