दुग्ध शाळा वसाहतींच्या विकासासाठी शासन एकात्मिक योजना राबवेल का? भाजप गटनेते आ.प्रविण दरेकर यांचा सवाल
05-Mar-2025
Total Views |
मुंबई: (pravin darekar on the development of dairy ) आज विधान परिषदेत दुग्ध विकास विभागाच्या तारांकित प्रश्नावर चर्चा सुरु असताना दुग्धशाळा वसाहतींच्या विकासासाठी शासन एकात्मिक योजना तयार करेल का, असा उपप्रश्न भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
सभागृहात बोलताना आ.दरेकर म्हणाले कि, दुग्ध शाळा वसाहतींच्या इमारती क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी एकात्मिक योजना तयार केली तर त्यातून घरे उपलब्ध होतील व ती शासकीय कर्मचाऱ्यांनाही देता येतील. हौसिंगमध्ये सरकार अमूलाग्र बदल करतेय, अनेक योजना आणतेय. त्यामुळे अशा ज्या दुग्ध वसाहती आहेत त्यांच्या एकात्मिक विकासाची योजना शासन तयार करेल का ?
दरेकर यांच्या प्रश्नावर बोलताना दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी दरेकर यांच्या सूचनेचा विचार करून पुढील काळात ज्या डेअरीच्या जागा आहेत तिथे शासनाला हौसिंगच्या माध्यमातून काही करता आले तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू, असे उत्तर दिले.