राहुल गांधी खटल्याला उपस्थित न राहिल्याने न्यायलयाने ठोठावला दंड
05-Mar-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना फटकारण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका खटल्यानुसार सुनावणी करण्यात आली की, ते सतत खटल्यादरम्यानच्या तारीखेला गैरहजर होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आता त्यांना १४ एप्रिल र२०२५ रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील एका विधानासंदर्भात राहुल गांधींनी गरळ ओकली होती. त्यासंबंधित हा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यांनी अकोल्यात सावरकरांचा अवमान करणारे विधान केले होते. त्यांनी सावरकरांना ब्रिटीशांचे पेन्शनधारक म्हटले होते. यानंतर आता लखनऊमधील एका वकीलाने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
या खटल्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या वतीने त्यांचे वकील उपस्थित होते, दरम्यान त्यांनी दावा केला की, राहुल गांधी हे व्यस्त आहेत. त्यांच्या दिल्लीमध्ये अनेक विविध बैठका होत आहे. न्यायालयाने युक्तीवाद न ऐकताना पुढील सुनावणीची घोषणी केली. मात्र पुढील सुनावणीस राहुल गांझी हजर राहिले नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश जारी केले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.