नवी दिल्ली : ( Vanuatu cancels Lalit Modi passport ) भारतीय अधिकाऱ्यांनी पुरेशा पुराव्याअभावी इंटरपोल अलर्टची विनंती नाकारल्याचा उल्लेख करून वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संस्थापक ललित मोदी याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
इंटरपोलच्या तपासणीसह त्यांच्या अर्जादरम्यान केलेल्या सर्व मानक पार्श्वभूमी तपासणीत कोणताही गुन्हेगारी दोष आढळला नाही, परंतु गेल्या २४ तासांत आपल्याला समजले आहे की इंटरपोलने ठोस न्यायालयीन पुराव्याअभावी मोदींवर अलर्ट नोटीस जारी करण्याच्या भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला दोनदा नकार दिला आहे. अशा कोणत्याही अलर्टमुळे मोदींचा नागरिकत्व अर्ज आपोआप नाकारला गेला असता.
परिणामी आपण नागरिकत्व आयोगाला मोदींचा वानुआतु पासपोर्ट रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचे पंतप्रधान नापट यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.