"चहावाला, सलूनवाला आणि मंडपवाल्यांचे पैसे उधार ठेवल्यास ते मोबाईलपेक्षा लवकर बदनामी करतात" : संजय शिरसाट

    07-Jan-2025
Total Views |
Sanjay Shirsat

मुंबई : चहावाला, सलूनवाला आणि मंडपवाल्याचे पैसे कधीच उधार ठेवू नयेत असे संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी आपल्या कार्यक्रमात म्हटले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर संजय शिरसाट यांचा पहिला जाहीर कार्यक्रम शिर्डी येथे झाला. या कार्यक्रमाला बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होती.

मंडपवाले हे सध्या लग्नासाठी कमी आणि सभांसाठी जास्त प्रमाणात लागतात असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंडपवाल्यांचे पैसे जेव्हाच्या तेव्हाच दिलेले बरे असतात. नाहीतर ते मोबाईलपेक्षाही वेगात आपली बदनामी करतात असे मिश्कील विधान शिर्डी येथील आपल्या सभेत संजय शिरसाट यांनी केले. त्यापुढे ते म्हणाले की, "मला एक माहित आहे, चहावाला, सलूनवाला आणि मंडपवाला यांचे पैसे कधीच उधार ठेवू नये. मंडपामध्ये खर्च चांगलाच झाला पाहिजे. मंडपवाल्यांचा पार्ट हा आमच्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे." यातून त्यांनी सगळ्यांना एकत्र येण्याचेही आवाहन केले.