मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही, नितीन बिक्कडांनी फेटाळले सुरेश धसांचे आरोप
07-Jan-2025
Total Views |
बीड : (Nitin Bikkad) मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड यांचे नाव घेतले होते. खंडणी प्रकरणातील व्यवहारासाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी जी चर्चा झाली ती नितीन बिक्कड यांनी घडवून आणली, असा आरोप आमदार धस यांनी केला आहे . यावर नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाही, असे नितीन बिक्कड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
वाल्मिक कराड यांच्यांशी कधीच कुठलीही बोलणी नाही
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन बिक्कड म्हणाले, "माझ्यावर होणारे सगळे आरोप खोटे आहेत. मी कुठल्याही खंडणी प्रकरणात नाही. माझे आजही आवादा कंपनीसोबत काम चालू आहे. जर मी या खंडणी प्रकरणात प्रकरणात असतो तर आवादा कंपनीने आतापर्यंत माझं ते काम काढून घेतलं असतं. गेल्या २५ दिवसांत माझं नावपण घेतलं असतं. माझे वाल्मीक कराड यांच्यांशी कसलेही संबंध नाही. धनंजय मुंडे यांच्याशी कामासंदर्भात भेट झालेली आहे, तेही एक ते दोन वेळेसच भेट झालेली आहे. वाल्मिक कराड यांच्यांशी कधीच कुठलीही बोलणी नाही, कॉल्सही नाही. त्यामुळे सुरेश धस यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे. मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. सुरेश धस यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे, त्यामुळे ते हे आरोप करत आहेत." असे त्यांनी सांगितले.
“मी २५ जूनला एका कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलाे"
“मी २५ जूनला एका कामानिमित्ताने धनंजय मुंडे यांना भेटलो होतो. धाराशिवच्या सीईओला फोन करायचा होता. त्या कामासंदर्भात भेटायला गेलो होतो. हा व्हिडिओ आहे, आवाज स्पष्ट ऐकू येतोय. धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान आहे. २५ आणि २६ जून असे सलग २ दिवस मी धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो होतो” असेही नितीन बिक्कड यांनी सांगितले.