मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhatke Vimukta Samaj) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभदरम्यान भटकेविमुक्त समाजातील संत-महंतांचे पवित्र स्नान नुसतेच संपन्न झाले. भटकेविमुक्त विकास परिषदेच्या सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमाने हे शक्य झाले. इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे की, देशभरातील १५० भटके विमुक्त समाजातील संतांना योगी सरकारचे निमंत्रण आले असून त्यानुसार त्यांनी महाकुंभात अमृतस्नान केले आहे. भटकेविमुक्त समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांनी नेहमीच देव, देश आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान पत्करले आहे.
हे वाचलंत का? : महाकुंभात ईशान्य भारतातील संतांचा विशेष गौरव
पुण्यातील कर्वेनगर, कोथरूड भागातील गोसावी समाजाचे भगत रोशन मकवान महाराज व कार्तिक मकवान गुरव यांच्यासह सरोदी समाजाचे योगेश्वर पुरी महाराज, समाधान गुलालकर महाराज, पूज्य गोरखनाथ महाराज, बंजारा संत व पू. फरांदे महाराज, धनगर समाजाचे गुरुही पवित्र स्नानात सहभागी झाले होते. महाकुंभासाठी भटकेविमुक्त समाजातील संत, भक्त आणि महाराजांना भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय घुमंतु कार्य यांच्या प्रयत्नातून उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने विशेष निमंत्रण मिळाले होते.
(अखिल भारतीय संत समागम कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या समवेत भटकेविमुक्त समाजातील संत महंत.)
समरस समाज निर्मितीसाठी ऐतिहासिक पाऊल
उत्तर प्रदेश सरकरकडून आलेले निमंत्रण आणि संत समागम कार्यक्रमात स्वतः उत्तर प्रदेश सरकारचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार ही केला, हा अतिशय आनंददायी प्रसंग होता. अश्या उपक्रमांमधून भटकेविमुक्त समाजास आदर, सन्मान समाजामधुनही मिळण्यास चालना मिळेल व समरस समाज निर्मितीसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात शंका नाही. उत्तर प्रदेश सरकारचे खरोखरच यासाठी मनापासून धन्यवाद व आभार.
- उद्धवराव विश्राम काळे, अध्यक्ष भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान व भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश