'नेत्रकुंभ'ही ठरला सांस्कृतिक एकात्मतेचा मेळावा

    25-Jan-2025
Total Views | 38

Netra Kumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Natra Kumbh) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात 'नेत्रकुंभ'ही आयोजित करण्यात आला आहे. नेत्रकुंभ देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेचा मेळा बनला असून विविध राज्यातून विविध वयोगटातील लोक डोळ्यांच्या रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी योगदान देत आहेत. आपल्या कामाचा कालावधी संपल्यानंतर ते आपापल्या घरी परततात, त्यानंतर नवीन स्वयंसेवक त्याठिकाणी जोडले जातात. हा क्रम नेत्रकुंभ संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

हे वाचलंत का? : अयोध्या, मथुरा, काशीसाठी वचनबद्ध होतो, आहोत, भविष्यातही राहू!


Netra Kumbh

महाराष्ट्राच्या विदर्भातील तरुण-तरुणींचा गट दि. १६ जानेवारी रोजी महाकुंभात आला होता, त्यांनी नुकताच आपला कार्यकाळ संपवून नेत्रकुंभात निरोप दिला. हे सर्वजण विद्यापीठात शिकत आहेत. नेत्रकुंभात जे पाहिले ते देशात यापूर्वी कधीच घडले नव्हते, अशा प्रकारचा अनुभव यावेळी आल्याचे त्यांनी सांगितले. येथे स्वयंसेवकांनी भाविकांना केवळ वैद्यकीय सेवाच दिली नाही तर संगमात अमृत स्नानाचा आनंदही घेतला. महाकुंभाच्या निमित्ताने नेत्रकुंभाचा कार्यक्रम एकाअर्थी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121