पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट; दिल्ली पोलिसांकडून रिपोर्ट सादर
04-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक स्टेटस रिपोर्टही सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पूजा खेडकरने दोनदा अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होती. या प्रमाणपत्राचा वापर करून तिने यूपीएससीमध्ये विशेष सवलत मिळवली होती. याच सवलतीमुळे तिला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याचे पदही मिळाले होते. परंतू, आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात हे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणीत तिने मी यूपीएससीला कोणतीही खोटी माहिती दिली नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता तिचे अपंगत्व प्रमाणपत्र खोटे असल्याची माहिती पुढे आली आहे.