शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरूवात
30-Sep-2024
Total Views |
मुंबई : २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे. सोमवारी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर २ हजार ३९९ कोटी रुपये रुपये जमा करण्यात आले आहे.