पर्यटन मंत्रालयाकडून पर्यटकांची अधिकृत आकडेवारी जाहीर!

    28-Sep-2024
Total Views |
foreign-tourists-came-to-the-country


नवी दिल्ली :     देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा अजूनही मागे आहे. जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे ४७.८ लाख परदेशी पर्यटक देशात आले, अशी माहिती पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत सर्वाधिक पर्यटक बांगलादेश आणि अमेरिकेतून आले आहेत.


हे वाचलंत का? -   विक्री तेजीत! सणासुदीसाठी ई-कॉमर्स कंपन्यांची मोठी ऑफर!


जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा अजूनही मागे आहे. या वर्षी जूनमध्ये ७,०६,०४५ परदेशी पर्यटक आले होते तर जून २०२३ मध्ये ६,४८,००८ परदेशी पर्यटक आहेत. जून २०१९ मध्ये ७,२६,४४६ परदेशी पर्यटक आले असून संख्या २०२३च्या तुलनेत नऊ टक्के अधिक २०१९ च्या तुलनेत २.८ टक्के कमी आहे.

आकडेवारीनुसार, २०२४च्या पहिल्या सहामाहीत भारतात सर्वाधिक २१.५५ टक्के विदेशी पर्यटक बांगलादेशातून आले होते. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४७,७८,३७४ परदेशी पर्यटक आले होते जे मागील वर्षी याच कालावधीत ४३,८०,२३९ इतके पर्यंटक देशात आले. तर २०१९ मध्ये कोविड महामारीपूर्वी याच कालावधीत जवळपास ५५ लाखांपर्यंत पर्यटक देशात आले होते. २०१९ च्या तुलनेत यंदाचा आकडा ९ टक्के अधिक आहे. अमेरिकेतून १७.५६ टक्के, ब्रिटनमधून ९.८२ टक्के, कॅनडातून ४.५ टक्के आणि कॅनडातून ४.३२ टक्के पर्यटक आले आहेत.