‘आयएनएस निस्तार’ भारतीय नौदलात दाखल

- खोल समुद्रातील बचाव मोहिमांसाठी देशातच बांधलेली पहिली नौका

    18-Jul-2025
Total Views | 6

ins-nistar-into-indian-navy 
 
नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी भारतात आरेखन करून बांधलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) आयएनएस निस्तार गुरुवारी भारतीय नौदलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली.
 
विशाखापट्टणम येथील नौदल तळावर पार पडलेल्या समारंभात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. घडला. हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने ही नोका बांधली असून, खोल समुद्रातील जटिल डायव्हिंग आणि बचाव मोहिमा पार पाडण्याची क्षमता केवळ निवडक देशांच्याच नौदलांकडे आहे.
 
या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री म्हणाले, भारतीय नौदल व देशी जहाजबांधणी उद्योगाचे हे मोठे यश असून, आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. ‘आयएनएस निस्तार’मुळे भारतीय नौदलाचा ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ आणि ‘प्रिफर्ड सिक्युरिटी पार्टनर’ म्हणून असलेला दबदबा अधिक भक्कम होईल, असे ते म्हणाले. सध्या नौदलासाठी उभारल्या जात असलेल्या ५७ युद्धनौकांपैकी सर्वच पूर्णपणे देशातच तयार होत असून, हे सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाला बळकटी देणारे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले, आयएनएस निस्तार हे केवळ एक तांत्रिक संपत्ती नसून, नौदलासाठी आणि प्रादेशिक भागीदारांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे. खोल समुद्रात पाणबुडी अडचणीत सापडल्यास त्यातून बचाव करण्यासाठी हे जहाज मदत करेल आणि भारताला ‘प्रिफर्ड सबमरीन रेस्क्यू पार्टनर’ बनवेल, असे ते म्हणाले. हे आत्मनिर्भरतेचा आणि देशातील वाढत्या समुद्री औद्योगिक क्षमतेचा उत्तम पुरावा असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
११८ मीटर लांबीचे व १०,००० टनांहून अधिक वजनाचे हे जहाज ३०० मीटर खोल समुद्रात डायव्हिंग व बचाव मोहिमा राबवू शकते. रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल्स, सेल्फ-प्रोपेल्ड हायपरबारिक लाईफ बोट, डायव्हिंग कम्प्रेशन चेंबर्स यांसारखी अत्याधुनिक उपकरणे यात बसवली आहेत. पाणबुडी अडचणीत आल्यास तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘मदर शिप’ म्हणूनही ती कार्य करते.
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

'चैरेवेति चैरेवेति' मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121