"राहूल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला..."; खासदार अनिल बोंडेंची राहुल गांधींवर टीका

    18-Sep-2024
Total Views | 32
 
Rahul Gandhi & Anil Bonde
 
मुंबई : राहूल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला चटके द्यायला हवेत, अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहूल गांधींची जीभ छाटणाऱ्याला माझ्यावतीने ११ लाखांचं बक्षीस देईल, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. याबद्दल बोलताना आता अनिल बोंडेंनी टीका केली आहे.
 
अनिल बोंडे म्हणाले की, "जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. पंरतू, राहूल गांधी जे आरक्षणासंदर्भात बोलले ते भयानक आहे. त्यामुळे जर असं कुणी विपरित बोलत असल्यास त्याची जीभ छाटू नये पण जीभेला चटके मात्र दिले पाहिजे. राहूल गांधी असो, ज्ञानेश महाराव असो, श्याम मानव असोत किंवा भारतातील बहुजन समाजाला जे जे दुखावतात त्या लोकांना कमीतकमी जाणीव करून द्यायला हवी. त्यामुळे जीभ छाटू नये पण जीभेला चटके द्यायला हवेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  उपोषणापूर्वी मंत्री शंभूराज देसाईंची जरांगेंशी फोनवरून चर्चा, म्हणाले...
 
राहूल गांधींनी अमेरिका दौऱ्यात आरक्षण रद्द करण्याबाबत भाष्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली. यातूनच संजय गायकवाड यांनी राहूल गांधींचा समाचार घेतला होता त्यानंतर आता अनिल बोंडे यांनी राहूल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121