उपोषणापूर्वी मंत्री शंभूराज देसाईंची जरांगेंशी फोनवरून चर्चा, म्हणाले...
18-Sep-2024
Total Views | 48
मुंबई : मनोज जरांगेंनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी त्यांच्याशी संवाद साधला.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "मनोज जरांगेंचं उपोषण सुरु होण्यापूर्वी मी त्यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. तुम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू नका, अशी विनंती मी त्यांनी सरकारच्या वतीने केली. त्यांच्या सगळ्या मागण्यांबाबत आम्ही पाठपूरावा सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही आमच्या सर्व कामावर लक्ष असून ते सतत विचारत असतात. तसेच आपण दिलेल्या आश्वसनांच्या अनुषंगाने लवकरात लवकर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने आमचं काम सुरु आहे."
" त्यामुळे मनोज जरांगेंनी उपोषणाला बसू नये, अशी मागणी मी त्यांना केली. परंतू, ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. कुठल्याही समाजाला आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी सरकारची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे मनोज दादांनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी त्यांना विनंती आहे. या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसायला हव्या. घाईगडबडीत काम केल्यास जे हातात आहे ते सुद्धा निघून जायला नको, असं मी त्यांना समजावून सांगितलं आहे," अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे.