मुंबई : वसईतील एका घरी वॉशिंग मशीनचा स्फोट झाला असून सर्व सामान जळून खाक झाले आहे. सोमवार, २६ ऑगस्ट रोजी ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा स्फोट कशामुळे घडला याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नाही.
हे वाचलंत का? - शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल!
सोमवारी वसईतील एका इमारतीत वॉशिंग मशिनच्या स्फोटामुळे आग लागली. हे वॉशिंग मशीन स्वयंपाक घरात असल्याने तिथल्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी एक महिला असून ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.