नवी मुंबई : संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथे दहावा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून याठिकाणी विविध क्षेत्रांतील तरुणांना ५ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हे वाचलंत का? - वसईत स्वयंपाक घरात वॉशिंग मशीनचा स्फोट!
या रोजगार मेळाव्यात सर्वांना मोफत प्रवेश असून स्पॉट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. महारोजगार मेळाव्याचे स्थळ आणि वेळ पुढीलप्रमाणे :
स्थळ :
वारकरी भवन, YMCA मार्ग, सेक्टर ४, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई.
वेळ :
सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत.
महारोजगार मेळाव्याची वैशिष्ट्ये!
नवी मुंबई आणि मुंबईतील अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
शासकीय रोजगार आणि स्वयं रोजगार योजनांची माहिती आणि अनेक महामंडळांचा सहभाग.
कॉलेज विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी इंटर्नशीपची संधी
इंजिनिअरिंग, बँकिंग, बँक ऑफिस, एअरपोर्ट्स, IT/IIT अशा ५ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी.