आसाममधील घुसखोरांची धक्कादायक आकडेवारी उघडकीस!

४८ हजारांपैकी ५६ टक्के गैर हिंदू

    24-Aug-2024
Total Views |

Bangladeshi Migrants
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladeshi Migrants) आसाम सरकारने आपल्या विधानसभेत राज्यातील घुसखोरांबाबत माहिती दिली असून आसाममध्ये सुमारे ४८ हजार घुसखोरांची ओळख पटली आहे. गेल्या साडेचार दशकातील घुसखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. १९७१ ते २०१४ दरम्यान राज्यात ४७,९२८ घुसखोरांची ओळख पटली असल्याचे आसाम सरकारने यावेळी सांगितले. या लोकांना राज्याच्या विदेशी न्यायाधिकरणाने परदेशी घोषित केले आहे. घुसखोरांपैकी ५६ टक्के गैर हिंदू असून यात २०६१३ हिंदूंची संख्या असल्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
राज्य विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, २७,३०९ मुस्लिम घुसखोरांपैकी सर्वाधिक ४१८२ मुस्लिमांची ओळख जोरहाट जिल्ह्यात झाली आहे. तर गुवाहाटी शहरात ३८९७ मुस्लिमांची ओळख पटली आहे. दिब्रुगडमध्ये २७८२ लोकांना मुस्लिम घुसखोर घोषित करण्यात आले आहे. याशिवाय होजई, शिवसनगर, नागाव आणि कछारमध्ये २००० हून अधिक मुस्लिम घुसखोरांची ओळख पटली आहे. याशिवाय आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिम घुसखोरांची ओळख पटली आहे. कचर, गुवाहाटी आणि लखीमपूर या जिल्ह्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे.
आसाममध्ये बांगलादेशातून होणारी घुसखोरी ही मोठी समस्या आहे. याबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, राज्यातील ७२% लोक आसामी बोलतात तर २८% बंगाली बोलतात. आसाम सरकारनेही राज्यातील बाह्य घुसखोरी आणि आसामची संस्कृती वाचवण्याबाबत आश्वासन दिले आहे.