"भारत उदारमतवादी आहे त्याचा फायदा घेऊ नको! पाकिस्तानात जा!", न्यायालयाने खालीदला ठणकावले
वैद्यकिय शिक्षणासाठी घेतलेला व्हिसा संपल्यावरही आठ वर्षे राहत होता पुण्यात
02-Aug-2024
Total Views | 68
(Image Credit : Wikipedia)
पुणे (Indian Visa) : वैद्यकिय शाखेत शिक्षणासाठी पाकिस्तानातून पुण्यात आलेल्या खलीद गोमेई मोहमद हसन या युवकाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ठणकावले आहे. खालीद पुण्यात शिक्षणासाठी सहकुटूंब रहाण्यासाठी आला होता. त्याचा (Indian Visa) व्हिसा २०१७ मध्येच संपला होता. मात्र, त्यानंतर त्याने नवीन व्हिसासाठी अर्जही केला नाही. इतकी वर्षे तो आपल्या पत्नी आणि मुलांसह पुण्यातच राहू लागला. याप्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने त्या युवकाला पुन्हा एकदा पाकिस्तानात जाण्याचा आदेश दिला आहे. "भारत देश हा उदारमतवादी आहे याचा गैरफायदा घेऊ नये.", असे मुंबई उच्चन्यायालयाने ठणकावून सांगितले आहे.
मुंबई उच्चन्यायालयाच्या रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने बुधवार ३१ जुलै रोजी याप्रकरणाची सुनावणी केली होती. खलिद गोमेई मोहमद हसन या युवकाला पुन्हा एकदा पाकिस्तानत जाण्याचा कोर्टाने आदेश दिला आहे. "आपण ज्या देशातून आलात. मग तो आखाती देश का असेना आपण पुन्हा आपल्या मायदेशी जाऊ शकता. भारत उदारमतवादी आहे याचा आपण फायदा घेऊ नये", असे न्यायालयाने सांगितले आहे.
खलिद गोमेई मोहमद गेल्या काही वर्षांपासून भारतात राहत होता. त्याचा (Indian Visa) व्हिसा २०१७मध्येच संपला होता. तरीही तो पुण्यातच राहत होता, या प्रकरणाची दखल पुणे पोलिसांनी घेतली. पुणे पोलिसांनी खलिदला देश सोडण्यासाठी सांगितले होते. पोलिसांनी त्याला अनेकदा नोटीसही बजावली होती. खलिदचे म्हणणे होते की, "जर तो भारतातून बाहेर गेला तर भारतीय संविधान आणि संयुक्त राष्ट्राच्या नियमांचं उल्लघन होईल."
खलिद हा २०१५ ला आपल्या पत्नीसोबत भारतात आला होता. त्यानंतर २०१७ ला त्याचा (Indian Visa) व्हिसा संपला होता. त्यानंतर त्याच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी त्याला देश सोडण्याबाबत नोटीसा देखील पाठवल्या. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी कार्यवाही केली आहे.