‘एसटी’ महामंडळाकडून अतिरिक्त बससेवा

    09-Jul-2024
Total Views |

एसटी
 
मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर लोकल रेल्वेसेवा प्रभावित झाली. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. या काळात ‘एसटी’ महामंडळाच्या माध्यमातून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे, मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने येथील प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, त्र्यंबकेश्वर, सातारा, कराड या बसेस तसेच श्रीवर्धन रायगड, चिपळूण, शिवथर रत्नागिरी बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येत होत्या.
 
पनवेल ते दादर मार्गावर सकाळी - 9, 9.05, 10.15, 10.30, 10.40
उरण ते दादर सकाळी- 5.30, 6.30, 7, 7.30, 8.15, 8.45, 9.10, 9.30, 10.30
पनवेल ते वाशी सकाळी- 10.20