'सरस्वती वंदना आणि सूर्यनमस्काराला मुस्लिम विद्यार्थ्यांनी विरोध करावा

जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात ठराव मंजूर

    06-Jul-2024
Total Views |

jamiat-ulema-e-hind

मुंबई (प्रतिनिधी) :
एकेकाळी आधुनिक शिक्षणाचा पुरस्कर्ता असलेली जमियत उलेमा-ए-हिंद (jamiat-ulema-e-hind) शैक्षणिक संस्थांमधील संघर्षाच्या नव्या वाटेवर पुढे जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती तिची योजना राबवण्याची तयारी करत आहे. जमियतने मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सरस्वती वंदना, धार्मिक गाणी आणि सूर्यनमस्कार यांसारख्या उपक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे आणि विरोध करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना अधार्मिक ठरवले आहे.

हे वाचलंत का? : राहुल गांधींविरोधात हिंदु जनजागृती समिती आक्रमक
जमियत मुख्यालयात जमियत उलेमा-ए-हिंदच्या व्यवस्थापन समितीच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला. यादरम्यान त्यांनी कुराण वाचणे त्याचे कथन करण्याचा सल्लाही मुस्लिम विद्यार्थ्यांना दिला आहे. हा ठराव मुस्लिम पालकांना त्यांच्या मुलांमध्ये तौहीद वर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतो. मुस्लीम समाजातील आधुनिक शिक्षणावर विविध सरकारे तसेच विचारवंतांकडून भर दिला जात असतानाच हा प्रस्ताव आणण्यात आला आहे.