युएईमधील गुन्हेगारीत ५० टक्के लोक पाकिस्तानी; पाक संसदीय समितीत खुलासे

    31-Jul-2024
Total Views |
gulf-nations-angry-with-pakistani-immigrants


नवी दिल्ली  :          संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि सौदी अरेबिया सारख्या आखाती देशांनी पाकिस्तानी कामगारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युएईमध्ये ५० टक्के गुन्हे पाकिस्तानी लोक करत असून दुसरीकडे सौदी अरेबिया पाकिस्तानातून येणाऱ्या गरीबांमुळे हैराण आहे. यासंबंधी सर्व खुलासे पाकिस्तानी संसदेच्या समितीत करण्यात आले आहेत.

माध्यमांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ही माहिती देशाच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटच्या परदेशी पाकिस्तानींसाठी स्थापन केलेल्या समितीला दिली आहे. समितीला सांगण्यात आले आहे की, युएई सारखे देश पाकिस्तानातून येणाऱ्या कामगारांवर खूश नाहीत आणि ते आता पाकिस्तानी लोकांना कामासाठी बोलावण्याऐवजी बांगलादेश येथील नागरिकांना प्राधान्य देत आहेत.

विशेष म्हणजे आखाती देशांमधील ५० टक्के गुन्हेगार पाकिस्तानी असून त्यांच्याकडून उर्मटपणाचे वर्तन होत असल्याचेही उघडकीस आले आहे. पाकिस्तानी संसदेत करण्यात आलेल्या खुलाश्यामुळे पाकिस्तानी कामगारांबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण येथे झालेल्या ५० टक्के गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी लोक सामील असल्याचे आढळले आहे. याशिवाय यूएईमध्येही पाकिस्तानी गैरवर्तन करत असून स्थानिकांना त्यांच्या वागण्याने त्रस्त आहे.