मोठी बातमी! अमोल मिटकरींच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

    30-Jul-2024
Total Views | 76
 
Amol Mitkari
 
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून आता ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "पुड्या सोडणार्‍यांनी सरकारला तात्काळ पुरावे द्यावेत!"
 
राज ठाकरेंनी पुण्यातील पुरस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यावर अमोल मिटकरींनी सुपारीबहाद्दरांनी अजितदादांबद्दल बोलू नये, असे म्हणत राज ठाकरेंवर पलटवार केला होता. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांनी याचा बदला म्हणून मिटकरींची गाडी फोडल्याचं बोललं जात आहे. यावेळी अकोल्यात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी अमोल मिटकरींची गाडीची तोडफोड असून दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व

देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 2047 सालापर्यंत ङ्गविकसित राष्ट्रफ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल, यात मला कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे. फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर्स इकोनॉमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात जनतेला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121