मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे! उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

    21-Jul-2025
Total Views | 27

मुंबई :
मुंबईतील बॉम्बस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने धक्का बसला असून आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या म्हणाले की, "मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याने धक्का बसला आहे. २००६ चा तपास, कायदेशीर प्रतिनिधित्व (Legal representation), न्यायालयीन मांडणी यात निश्चितपणे त्रुटी राहिल्या असतील, परंतू, मुंबईकरांना न्याय हवा आहे. हे जे अतिरेकी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की, चांगली तपास समिती, लीगल टीमची रचना करा, सर्वोच्च न्यायलयात जा. मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे," असे ते म्हणाले.

११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्द करत निर्दोष केले आहे. या खटल्यात १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करून त्या सर्व आरोपींना तातडीने कारागृहातून सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. पुराव्याअभावी तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य न आढळल्याचे उच्च न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले आहे.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121