मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहेकालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असून सूरज चव्हाणांना समज दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच शांततेच्या मार्गाने आपली राजकीय, सामाजिक, शेतकऱ्यांप्रति असलेली भावना श्रद्धेने आणि आदराने व्यक्त केली. कालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. काल माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळी मला भेटले त्यावेळी त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो. त्यामुळे त्यांनी पत्ते टाकले तरी मी शांतपणे उभे राहून त्यांचे निवेदन स्विकारले. त्यांचे आभारही मानले. त्यानंतर लातूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी मी जवळपास दीड तास चर्चा केली."
"काल सूरज चव्हाण यांच्याकडून घडलेली घटना निंदनीय आहे. पक्ष त्याची गांभीर्याने नोंद घेईल. सूरज चव्हाण यांना अजितदादांनी बोलवले आहे. ते त्यांना सूचना देतील. मी सूरज चव्हाण यांना समज दिली असून जे घडलं ते अयोग्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले," असे ते म्हणाले.
अजितदादा कृषीमंत्र्यांना समज देतील!
"कृषीमंत्र्यांकडून काही वेळा शेतकऱ्यांप्रकरणी आलेली वक्तव्ये चुकीची होती. याप्रकरणी अजितदादांनी त्यांना समज दिली होती. आता याप्रकरणाचीसुद्धा गंभीर नोंद घेऊन अजितदादा त्यांना समज देतील," असेही सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहेकालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असून सूरज चव्हाणांना समज दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच शांततेच्या मार्गाने आपली राजकीय, सामाजिक, शेतकऱ्यांप्रति असलेली भावना श्रद्धेने आणि आदराने व्यक्त केली. कालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. काल माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळी मला भेटले त्यावेळी त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो. त्यामुळे त्यांनी पत्ते टाकले तरी मी शांतपणे उभे राहून त्यांचे निवेदन स्विकारले. त्यांचे आभारही मानले. त्यानंतर लातूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी मी जवळपास दीड तास चर्चा केली."
"काल सूरज चव्हाण यांच्याकडून घडलेली घटना निंदनीय आहे. पक्ष त्याची गांभीर्याने नोंद घेईल. सूरज चव्हाण यांना अजितदादांनी बोलवले आहे. ते त्यांना सूचना देतील. मी सूरज चव्हाण यांना समज दिली असून जे घडलं ते अयोग्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले," असे ते म्हणाले.
अजितदादा कृषीमंत्र्यांना समज देतील! "कृषीमंत्र्यांकडून काही वेळा शेतकऱ्यांप्रकरणी आलेली वक्तव्ये चुकीची होती. याप्रकरणी अजितदादांनी त्यांना समज दिली होती. आता याप्रकरणाचीसुद्धा गंभीर नोंद घेऊन अजितदादा त्यांना समज देतील," असेही सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.