“भारतीय चित्रपटसृष्टीचे आधुनिक भविष्य पाहणारे...”, रामोजी राव यांच्या निधनाने पंतप्रधान मोदीही भावूक

    08-Jun-2024
Total Views |
 
pm modi
 
 
मुंबई : रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकारांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रामोजी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो असे त्यांनी म्हटले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचे निराळे आणि आधुनिक भवितव्य पाहणारे रामोजी राव होते. पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. देशाच्या प्रगतीसाठी रामोजी राव हे फार सक्रियपणे काम करत होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो”, या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.