शेअर बाजार अपडेट: बाजारात मजबूती सेन्सेक्स ७९३.१३ अंशाने वाढला

बँक निर्देशांकात वाढ तर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्येही वाढ कायम

    07-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निवडणूकीचा निकाल व एमपीसी पतधोरणाचा निकाल जाहीर होण्याचा पार्श्वभूमीवर बाजारात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. परिणामी बाजारात पुन्हा रॅली झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ७९३.१३ अंशाने वाढत ७५८६७.६४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २२१.९० अंशाने वाढत २३०४३.३० पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक २९४.९५ अंशाने वाढत ५६४५२.१० पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक २८१.८५ अंशाने वाढत ४९५७३.७५ पातळीवर पोहोचला आहे.बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६८ व १.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०० व १.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आज एकही प्रकारच्या समभागात सकाळी घसरण झालेली नाही. सर्वाधिक वाढ आयटी (३.१०%) मिडिया (१.५२%), फार्मा (१.५८%), कनज्यूमर ड्युरेबल्स (१.३८%), रियल्टी (१.४४%) समभागात झाली आहे.
 
आज आरबीआयच्या वित्तीय पतधोरण समितीने आपले निकाल जाहीर केले आहे ज्यामध्ये रेपो दर सलग आठव्यांदा स्थिर ठेवण्यात आला आहे. ६.५ टक्क्यांवर रेपो दर ठेवण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेत स्थिरता व मजबूती येईल असा अंदाज तज्ञां कडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय पुन्हा मोदी एनडीए सरकार आल्यामुळे आर्थिक धोरणे पुढे सारखीच राहिल्याने विकासाला चालना मिळू शकते.या प्रमुख दोन कारणांमुळे बाजारात वाढ झाली आहे.
 
मिडकॅप व्यतिरिक्त स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने बाजारात रॅली झाली आहे. विशेषतः बँक निर्देशांकात सलग तिसऱ्यांदा वाढ झाल्याने बाजारात मोठा सपोर्ट मिळू शकला. आगामी काळात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने बाजारात गुंतवणूकदारांची गुंतवणूक देखील वाढू शकते.
 
आज बीएसईत विप्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्लू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएलटेक, बजाज फिनसर्व्ह, टायटन कंपनी, टीसीएस,पॉवर ग्रीड, टाटा मोटर्स, एम अँड एम, एनटीपीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, एक्सिस बँक, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटस, एचयुएल, इंडसइंड बँक, मारूती सुझुकी, आयटीसी समभागात वाढ झाली आहे तर प्रेसटीज इस्टेट, फिनोलेक्स केबल्स, सुप्रीम, इक्विटाज बँक, टाटा केमिकल्स, आरईसी, माझगाव डॉक, त्रिवेणी टर्बाईन अदानी ग्रीन एनर्जी,कोलगेट, होम फर्स्ट, सेंच्युरी, सिमेंस, सनोफी इंडिया, कॅप्री ग्लोबल, लिंडे इंडिया, जिंदाल स्टील, बजाज ऑटो, जेएसडब्लू एनर्जी, मेट्रो ब्रँडस, कोल इंडिया, ब्रिटानिया, आयआरएफसी, अतूल, आयआरसीटीसी या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत विप्रो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचसीएलटेक, जेएसडब्लू स्टील, डॉ रेड्डीज, एम अँड एम, एनटीपीसी, टीसीएस, टायटन कंपनी, एक्सिस बँक, अदानी पोर्टस, लार्सन, टाटा मोटर्स, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी , एचडीएफसी बँक, ग्रासीम, डिवीज, इंडसइंड बँक, एचयुएल, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल, मारूती सुझुकी, अदानी एंटरप्राईज, हिंदाल्को, आयशर मोटर्स, बीपीसीएल, कोल इंडिया या समभागात वाढ झाली आहे तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज ऑटो, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, ब्रिटानिया या समभागात घसरण झाली आहे.