एनडीएच्या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं विधान, म्हणाले, "आमचा उद्देश..."

    07-Jun-2024
Total Views | 103

Eknath Shinde 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवणं हाच आमचा प्रथम उद्देश आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. आज नवी दिल्ली येथे आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे. यासोबतच आजची बैठकसुद्धा महत्वपूर्ण आहे. मोदीजींना पंतप्रधान बनवणं हा आमचा सर्वात प्रथम उद्देश आहे. तो उद्देश आता सफल होताना दिसतोय आणि शिवसेना पक्ष अतिशय आनंदी आहे," असे ते म्हणाले.
 
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, "ज्यावेळी महाराष्ट्रचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून विरोधक आज सरकार पडणार, उद्या पडणार, असं सांगत आहेत. परंतू, त्यांना योग्य ज्योतीषी सापडत नाहीये. त्यामुळे आज विरोधी पक्ष अपयशी झाला आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. अनेक लोक मोदीजींना तडीपार करा म्हणत होते. पण जनतेने त्यांनाच तडीपार केलं आहे," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121