"मला खासदारकीची शपथ घेण्यासाठी जामीन द्या" - फुटीरतावादी नेता 'इंजीनियर रशीद'ची कोर्टात मागणी

    07-Jun-2024
Total Views | 117
 Rashid Sheikh
 
नवी दिल्ली : काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले इंजीनियर रशीद या नावाने प्रसिद्ध असलेल्या रशीद शेख याने संसद सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी अंतरिम जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज केला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) दाखल केलेल्या खटल्यात दहशतवाद्याला वित्तपुरवठा केल्याच्या आरोपावरून राशिदला दि. ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहे.
 
इंजीनियर रशीद याने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून २,०४,१४२ मतांनी पराभव केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. रशीदच्या वकीलांनी एएनआयला सांगितले की, शपथ घेण्यासाठी आणि इतर संसदीय कामकाज करण्यासाठी अंतरिम जामीन आणि पर्यायी कोठडी पॅरोलची मागणी करणारा अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला.
 
रशीदच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास न्यायलयाने तयारी दाखवली आहे. एनआयएला उत्तर दाखल करण्यासाठी शुक्रवारची तारीख दिली आहे. इंजीनियर दोन वेळा आमदार असल्याचेही ओबेरॉय यांनी म्हटले आहे. आता निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना खासदार म्हणून शपथ घ्यावी लागणार आहे. शपथविधीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, इंजिनियर रशीद बारामुल्लामधून अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्याने ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला.
  
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121