आरबीआयकडून अलर्ट जारी; बँक खात्यावर सायबर हल्ल्याचा धोका!

    30-Jun-2024
Total Views | 51
rbi alert cyber attack


मुंबई  :   
 देशातील कोट्यवधी बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. सेंट्रल बँकेने बँक खात्यांवर सायबर हल्ल्याचा धोका ओळखून सर्व बँकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना केल्या असून “24 तास सतर्क राहा,” असे म्हटले आहे.

“बँकांवर सायबर हल्ला होणार आहे,” अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सेंट्रल बँकेने सर्व बँका आणि आर्थिक संस्थांना दि. 24 जून रोजी एक पत्र पाठवून अलर्ट दिला आहे. “सर्विलन्सची क्षमता वाढवा आणि उर्वरित उपायसुद्धा वापरा,” असे बँकांना सांगण्यात आले आहे. याआधीही सीईआरटी-इनने गेल्यावर्षी यांसारख्या धोक्याची सूचना जारी केली होती.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121