जाणून घ्या, पश्चिम बंगालमध्ये ३२ हजार जवान तैनात राहणार!

    03-Jun-2024
Total Views |
west bengal jawan tmcनवी दिल्ली :
     लोकसभा निवडणुकीकरिता मतदान संपुष्टात आले असले तरी पश्चिम बंगालमधून जवानांची फौज अद्यापही हटविण्यात आलेली नाही. जूनला मतदानाचे निकाल जाहीर होणार असून सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून ३२ हजार सैनिकांची फौज तैनात राहणार आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील मतदानानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यातील ४२ जागांपैकी भाजपला पहिल्यांदाच मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया आघाडीला राज्यात फटका बसणार असून या सगळ्यात निवडणुकीतील हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या राज्यात यावेळीही परिस्थिती नियंत्रणात राहण्याकरिता फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राजकीय हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध बंगालमध्ये निवडणुका संपल्या असल्या तरीही राज्यात ३२ हजार सैनिक तैनात राहणार आहेत. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याचबरोबर, पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रथमच १८ जागा जिंकल्या, तर टीएमसी २२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण, महत्त्वाचे म्हणजे भाजप २ जागांवरून १८ वर, तर तृणमूल काँग्रेस ३४ वरून २२ वर आली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावरही संदेशखळीचा मुद्दा चर्चेत राहिला. बसीरहाटच्या या भागात सत्ताधारी टीएमसी (तृणमूल काँग्रेस) नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर आदिवासी समाजातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता, याप्रकरणी अटकही करण्यात आली होती परंतु, राज्य सरकारकडून त्यास संरक्षण देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम ध्रुवीकरणाचा खेळही जोरात खेळला गेला.

निवडणुका संपल्या असल्या तरी पुढील काही दिवस निमलष्करी दलाच्या कंपन्या पश्चिम बंगालमध्ये कायम राहणार आहेत. 'केंद्रीय सशस्त्र पोलिस दल' (CAPF) च्या ४०० कंपन्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. ४ जून रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला तरी पुढील २ आठवडे सैनिक येथेच राहतील. त्यांना १९ जूनपर्यंत येथे मोर्चा काढण्यास सांगण्यात आले आहे. २०२३ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीतही ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.