बांग्लादेशचं बॅड लक; डीआरएसने फेरलं विजयावर पाणी!

    11-Jun-2024
Total Views |
sa vs ban world cup match
 

नवी दिल्ली :     दक्षिण आफ्रिका विरुध्द बांग्लादेश यांच्यात नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात डीआरएसवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. महमुदुल्लाह याला चुकीच्या पध्दतीने पायचीत बाद ठरविण्यात आल्या. तसेच, चेंडू लेग बायसह बाऊंड्री पार गेला. बाद झाल्यानंतर डीआरएसच्या मदतीने निर्णय बदलावा लागला.

दरम्यान, डीआरएसच्या मदतीने नाबाद ठरविल्यानंतर बांग्लादेश संघाला लेग बायच्या ४ धावा मिळाल्या नाहीत कारण फलंदाज ऑनफील्ड अंपायरने बाद ठरविल्याने बॉल ग्राह्य धरण्यात आला नाही. विशेष म्हणजे याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ धावांनी विजय मिळविला.

डीआरएसच्या निर्णयामुळे संपूर्ण सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. बांग्लादेश संघाला लेग बायचा फायदा मिळाला असता तर सामन्याचे चित्र वेगळे असते. विशेषतः बांगलादेश सामना जिंकण्यासाठी मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते, विशेषत: शेवटच्या ४ षटकांत लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना २७ धावांची आवश्यकता असताना डीआरएसचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने काम केल्याचे पाहायला मिळाले.