IPO Update: १४ जूनपासून GPES Solar India कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार

प्राईज बँड ९० ते ९४ रुपये प्रति समभाग निश्चित

    11-Jun-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: जीपीईस सोलार इंडिया लिमिटेड (GPES Solar India Limited) कंपनीचा आयपीओ १४ जूनला शेअर बाजारात दाखल हौणार आहे. १४ ते १७ जूनपर्यंत हा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे २४ जून पर्यंत कंपनी नोंदणीकृत होणार आहे.
 
कंपनीने प्राईज बँड ९० ते ९४ प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १२०० समभागांचा गठ्ठा (Lot) आयपीओ साठी खरेदी करावा लागेल.आयपीओ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी ११२८०० रुपयांची गुंतवणूक या आयपीओसाठी करणे अनिवार्य Corporate CapitlaVentures Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Ss Corporat e Securities ही कंपनी काम पाहील.
 
२० जूनपासून या आयपीओतील समभागाचे (Shares) चे वितरण होणार आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २१ जूनपासून मिळू शकतो. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर ३५ टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी उपलब्ध असणार आहे तर १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) उपलब्ध असणार आहे.
 
कंपनीने आयपीओआधी ८.३० टक्के वाटा अँकर गुंतवणूकदारांकडून (Private Investors) कडून १३ जूनला स्विकारण्यात येणार आहे. दिपक पांडे, अंजू पांडे, अस्तिक त्रिपाठी हे या कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी २०१० साली स्थापन झाली होती. सौर ऊर्जा इव्हेरटर व सोलार पॅनल व तत्सम उत्पादने कंपनी बनवते.
 
३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २५.०८ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ३३.४३ टक्क्यांनी वाढ झाली होती. ३१ मार्च २०२३ मधील ४७१५.१९ कोटी असलेला महसूल वाढत ४७२८.७५ कोटींवर पोहोचला आहे तर करोत्तर नफ्यात ३६९.८२ कोटींवरून वाढत ४७३.२७ कोटीवर पोहोचला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, इतर गुंतवणूकीसाठी, मशिनरी खरेदीसाठी, तसेच दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.