एफपीआयने गुंतवणूक काढूनही मे महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकीत नवा 'उच्चांक '

मे महिन्यात ३४६९७ कोटींची नवी आकडेवारी जाहीर एप्रिलपेक्षा ८३.४२ टक्क्यांनी गुंतवणूकीत वाढ

    10-Jun-2024
Total Views |

Mutual Fund
 
 
मुंबई: मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात मोठी वाढ झाली आहे.मे महिन्यात म्युच्युअल फंडाने नवा विक्रम करत एसआयपी गुंतवणूकीत देखील मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात ही वाढ ३४६९७ कोटींची नवीन गुंतवणूकीची आकडेवारी समोर आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या नव्या आकडेवारीनुसार, मागच्या महिन्यातील गुंतवणूकीपेक्षा ८३.४२ टक्क्यांनी ही वाढ झाल्याचे म्हटले गेले आहे. हा इंडस्ट्रीतील नवा उच्चांक गुंतवणूकीने गाठला आहे.
 
सलग ३९ व्या महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकीत मोठी वाढ झाली. एसआयपी (SIP) गुंतवणूकीत एप्रिल महिन्यातील २०३७१ कोटींवरून वाढ होत २०३७१ कोटींवर वाढ झाली आहे. पहिल्यांदाच इक्विटी म्युच्युअल फंडमधील नेट इनफ्लो ३०००० कोटीहून अधिक वाढला आहे. या महिन्यात म्युच्युअल फंड क्षेत्रात व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management) मध्ये ५८.९१ लाख कोटींवर पोहोचले. प्रामुख्याने न्यू फंड ऑफर व थीमॅटिक फंडात ही वाढ झाल्याने बाजारात गुंतवणूकीचा आलेख चांगलाच वाढलेला दिसत आहे.
 
परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातील आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात मे महिन्यात काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारताच्या अर्थव्यवस्थेतील यशोगाथेमुळे आपली गुंतवणूक कायम ठेवली होती. गुंतवणूकीतील स्थिरता कायम असल्याने बाजारात मोठी वाढ झाली. मिड कॅप फंडात एप्रिल महिन्यातील १७९३ कोटींच्या तुलनेत मे महिन्यात २६०५.५ कोटीं पर्यंत वाढ झाली आहे तर स्मॉलकॅप फंडात एप्रिल महिन्यातील २२०८.७० कोटींच्या तुलनेत मे महिन्यात २७२४.६७ कोटींवर पो होचले. लार्जकॅप फंडात एप्रिल महिन्यातील ३५८ कोटींच्या तुलनेत मे महिन्यात ६६३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे.